खजूर खाण्याचे 8 फायदे; रोज फक्त 2 खजूर खा, तब्येतीच्या तक्रारी दूर

खजूर खाण्याचे 8 फायदे; रोज फक्त 2 खजूर खा, तब्येतीच्या तक्रारी दूर

खजूर खाण्याचे 8 फायदे; रोज फक्त 2 खजूर खा, तब्येतीच्या तक्रारी दूर

खजूर खाण्याचे फायदे

केवळ थंडीतच नाही तर एरवीही खजूर खाण्याला आरोग्य मूल्य आहे. खजुरातील पोषक घटकांमुळे खजुराला ‘वडंर फूड’ असं म्हटलं जातं. निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदात खजूर खाण्याला महत्व आहे. 2 खजूर रोज खाल्ल्यास तब्येतीच्या अनेक तक्रारी दूर होतात, गंभीर आजारांचा धोका कमी होतो.

Image: Google

रोज खजूर खाल्ल्यास..

1. खजूर खाल्ल्यानं शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. 100 ग्रॅम खजूर खाऊन 277 कॅलरीज मिळतात. खजूरातून शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम, काॅपर, मॅगनीज, लोह ही खनिजं आणि ब हे जीवनसत्व मिळतं.

2. खजुरात असलेल्या फायबरचा उपयोग पचनक्रिया सुधारण्यास होतो. खजूर खाल्ल्यानं बध्दकोष्ठतेचा त्रास होत नाही. पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. वजन आटोक्यात ठेवण्यास खजुराचा उपयोग होतो.

3. खजुरातील ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे गंभीर आजारांपासून संरक्षण होतं. सुकामेव्यात खजुरात सर्वात जास्त ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. खजुरात असलेल्या फ्लेवोनाॅइडस या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे मधुमेह, अल्झायमर आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. खजुरात असलेल्या कॅरेटोनाॅइड या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे ह्दयाचे आणि डोळ्याचे आरोग्य चांगलं राहातं. खजुराचा फायदा मेंदूविकासासाठे होतो.

Image: Google

4. गरोदरपणात नैसर्गिक प्र्सूती होण्यासाठी खजुर खाण्याचा फायदा होतो. तसेच प्रसूती काळातल्या वेदनांमुळे आलेला अशक्तपणाही खजुराचा आहारात समावेश केल्यानं दूर होतो.

5. खजुरात फ्रक्टोज ही साखर असते. साखर न वापरता पदार्थांमध्ये गोडवा येण्यासाठी खजुराचा वापर आरोग्यदायी ठरतो. आहारातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी खजुराचा उपयोग केल्यानं वजनही आटोक्यात राहातं.खजुराचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. म्हणजे खजूर खाल्ल्याने रक्तातील साखर लगेच वाढत नाही. साखर नियंत्रित ठेवण्यास फायदा होतो.

6. खजुरामध्ये असलेल्या कॅल्शियम आणि फाॅस्फरसचा फायदा हाडांचं आरोग्य सुधारण्यासाठी होतो. हाडं मजबूत ठेवण्यासाठी खजुराचा उपयोग होतो. खजूर नियमित खाल्याने हाडांच्या विकाराचा धोका टळतो.

Image: Google

7. खजुरातील क जीवनसत्वामुळे त्वचा चांगली राहाण्यास मदत होते आणि ब जीवनसत्वामुळे केस गळती रोखण्यास खजुराचा उपयोग होतो.

8. खजुरात लोहाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे नियमित खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबीनचं प्रमाण वाढतं. रोजच्या आहारात खजूर असल्यास ॲनेमियाचा धोका टळतो.

This post was last modified on Tháng mười một 19, 2024 12:18 chiều