Last updated on October 5th, 2024 at 04:50 pm
- रोजाना सिर्फ 1 चुकंदर खाने से मिलते हैं गजब के फायदे
- रोज सुबह पानी में उबालकर पिएं सौंफ, सेहत को मिलेंगे 5 जबरदस्त फायदे
- Multani mitti hair mask : लंबे, घने और चमकदार बालों के लिए ट्राई करें ये 3 मुल्तानी मिट्टी हेयर मास्क
- 1 महीने तक सुबह खाली पेट गुनगुने पानी में नींबू डालकर पीने से क्या होता है?
- रोज खाते हैं टमाटर तो जान लें आयुर्वेद के अनुसार इसके फायदे और नुकसान
(shatavari kalpa uses in marathi, shatavari powder benefits in marathi, shatavari kalpa powder, shatavari kalpa powder benefits in marathi, shatavari kalpa benefits, shatavari powder benefits, shatavari che fayde in marathi, shatavari benefits in marathi, shatavari powder uses, shatavari kalpa powder benefits, shatavari in marathi, shatavari powder benefits for male in marathi, शतावरी कल्प फायदे मराठी, शतावरी कल्प चे फायदे मराठी, शतावरी कल्प घेण्याचे फायदे, शतावरी कल्प फायदे, शतावरी पावडर बेनेफिट्स)
Bạn đang xem: शतावरी चे फायदे- या एकाच वनस्पतीतून मिळवा १० फायदे | shatavari kalpa benefits in marathi
शतावरी चे फायदे तुम्हाला माहीत असतील किंवा नसतील हे माहीत नाही. तुम्हाला हे महिते का की शतावरी ही एक अशी वनस्पति आहे जे तुमच्या दैनंदिन आरोग्य संबंधित जवळपास सर्वच गरजांना पूर्ण करून समस्या सोडवू शकते. त्यामुळेच शतावरी एक अनमोल वनस्पति ठरते.
या आयुष्यात तुम्ही निरोगी आणि तांदरुस्त राहण्यासाठी अनेक अनेक, काय काय उपाय करत असाल. मग त्यापेक्षा ही आयुर्वेद औषधी वाईट आहे का?
शतावरी चे आयुर्वेदात अनेक उपयोग सांगितले आहे आणि त्यामुळेच शतावरी अनेक वर्षांपासून आरोग्य समस्या दूर करण्यासाठी वापरण्यात येणारी एक महत्वाची वनस्पति आहे. अनेक वर्षांपासून जरी वापरात असली तरी खूप कमी लोकांना याचे सर्व उपयोग आणि त्याची सविस्तर माहिती आहे.
विशेष करून स्त्रियांसाठी शतावरी वनस्पति खूप फायदेशीर आहे. विशेषतः महिलांच्या हार्मोनल संतुलनासाठी शतावरी अतिशय प्रभावी ठरते. बऱ्याच लोकांना फक्त एवढेच एक काय ते माहीत आहे. पण आश्चर्याची गोष्ट अशी की शतावरी फक्त महिलांसाठीच नाही, तर पुरुषांच्या आरोग्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे!
शतावरी कल्पाचे फायदे अनेक आहेत, ज्यात प्रमुख म्हणजे प्रजननक्षमता वाढवणे, महिला विषयी तक्रारी, केस गळणे थांबवणे, यांचा समावेश आहे.
शतावरी विशेष करून स्त्रियांमध्ये अनेक आजारांवर फायदेशीर ठरते. अनेक महिलांनी शतावरीच्या वापरामुळे हार्मोनल समस्या कमी झाल्याचे अनुभवले आहे. त्यामुळे आपण या ब्लॉग स्त्रियांसाठी शतावरी चे फायदे आणि इतर आरोग्य समस्यांमध्ये मिळणारे फायदे अशा दोन विभागांमध्ये याची मांडणी करणार आहोत.
महिलांसाठी शतावरी चे फायदे (Shatavari kalpa benefits for female)
१. प्रजनन आरोग्य (Reproductive health)
महिलांचे एकंदर प्रजनन आरोग्य सुधारण्यासाठी शतावरी कल्पाचा खूप फायदा होतो.
महिलांचे प्रजनन आरोग्य आणि शतावरी चे फायदे या संबंधीचा अभ्यास करण्यासाठी अनेक प्रयोग झाले आहेत. त्याचे निष्कर्ष आणि अभ्यास हे शतावरीचा उपयोग महिलांच्या प्रजनन संबंधित समस्येवर कसा होतो याचे विश्लेषण करतात.
बायोमेडिसिन आणि फार्माकोथेरपी मधील या संशोधनानुसार शतावरी स्त्रियांच्या मध्ये हार्मोनल असंतुलन, पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस), फॉलिक्युलर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आणि वंध्यत्व यांसारख्या समस्येवर उपयोगी ठरू शकते.
या संशोधन संबंधित सविस्तर माहिती वरील लिंक वर बघायला मिळेल.
याच संशोधनाचा आधार घेऊन आपण पुढची माहिती बघणार आहोत.
शतावरी कल्प कसे महिलांचे प्रजनन आरोग्य सुधारू शकते याची एकेक करून माहिती बघूया.
ओव्हुलेशन (Ovulation)
प्रजनन आरोग्य म्हटले की मासिक पाळी आलीच. प्रजनन आरोग्य चांगले राहण्यासाठी मासिक पाळी वेळवर येणे वगैरे, म्हणजेच मासिक पाळी संबंधित सर्व घटक प्राकृत आणि नॉर्मल असणे गरजेचे आहे.
कारण या मासिक पाळी दरम्यान बिजकोष फुटून त्यातून स्त्रीबीज बाहेर पडते आणि पुरुष बीज सोबत येऊन गर्भधारणा करते. याच बिजकोशातून स्त्रीबीज बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला ओव्हुलेशन म्हणतात.
जर हे स्त्रीबीज बाहेर नाही पडले तर गर्भधारणा होण्यासाठी व्यत्यय निर्माण होतो.
हे Ovulation न होण्याचे कारण म्हणजे मासिक पाळी दरम्यान estrogen हॉरमोन वाढणे. वाढलेली estrogen ची पातळी ओव्हुलेशन थांबवू शकते.
संबंधित – मासिक पाळी किती दिवस असते आणि ovulation म्हणजे काय ?
शतावरी चे फायदे तुम्हाला या परिस्थिति मध्ये सुद्धा बघायला भेटतील.
शतावरी ही वाढलेली ईस्ट्रोजन हॉरमोन ची पातळी कमी म्हणजेच नॉर्मल करते. ज्यामुळे स्त्रीबीज बाहेर पडण्याची शक्यता निर्माण होते.
2014 मध्ये जर्नल ऑफ एथनोफार्माकोलॉजीमध्ये (Journal of Ethnopharmacology) मध्ये एक संशोधन प्रकाशित झाले होते. या शोधनिबंधात शतावरी अर्काचा मादी उंदरांवर होणाऱ्या परिणामांचा शोध घेण्यात आला.
“या अभ्यासात असे आढळून आले की शतावरीचा मानवी मासिक पाळीवर देखील सकारात्मक परिणाम होऊन संबंधित ovulation आणि गर्भधारणा या प्रक्रिया चांगल्या रीतीने पार पडू शकतात.”-Journal of Ethnopharmacology
शतावरी कल्प हे स्त्रियांमध्ये नियमित ओव्हुलेशन प्रक्रिया घडून आणण्यास मदत करते.
आशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमित शतावरी कल्प घेतले तर ओव्हुलेशन प्रक्रिया चालू होईल ज्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता वाढेल.
स्त्रीबीज गुणवत्ता
गर्भधारणा होण्यासाठी अजून एक महत्वाचा घटक म्हणजे स्त्रीबीज गुणवत्ता. प्रत्येक मासिक पाळी ला बाहेर पडणारे फक्त गुणवत्तापूर्ण स्त्रीबीज हे गर्भधारणा करू शकते.
हे स्त्रीबीज कमी प्रमाणात असेल आणि क्षमता पूर्ण नसेल तर गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते.
Xem thêm : रात को दूध में मिलाकर खाएं अलसी और कद्दू के बीजों का पाउडर, मिलेंगे ये 5 फायदे
स्त्रीबिजाची गुणवत्ता वाढवण्यासाठी सुद्धा शतावरी कल्पाचा उपयोग होतो.
2017 मध्ये जर्नल ऑफ ह्यूमन रिप्रॉडक्टिव्ह सायन्सेसमध्ये (Journal of Human Reproductive Sciences) एक शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला होता. यानुसार असे दिसून आले आहे की शतावरीचा मादी उंदरांच्या oocytes (अपरिपक्व बीज) मध्ये सकारात्मक परिणाम होतो.
२. गर्भधारणा नंतर शतावरी कल्पाचे फायदे
एकंदर प्रजनन आरोग्य आणि त्यामुळे गर्भधारणा होण्यास कसे शतावरी चे फायदे मिळतात याची माहिती आपण बघितली. यानंतर गर्भधारणा पश्चात म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर सुद्धा आपल्याला त्या परिस्थितिमध्ये सुद्धा शतावरी चे फायदे बघायला मिळतात. यच संबंधी पुढे माहिती बघूया.
गर्भपात चा धोका कमी करणे
गर्भधारणा झाल्यानंतर अनेक स्त्रियांना गर्भपात होण्याची शक्यता राहते. जगात ७ पैकी एक गर्भधारणा गर्भपात झाल्यामुळे धोक्यात येते. तेच जर भारत देशाचे प्रमाण बघितले तर ७.३ टक्के एवढे आहे, जवळपास सारखेच.
हे गर्भपात अनेक कारणांमुळे होतात. कधी गर्भाशय चे आजार, कधी गर्भाचे व्यवस्थित पोषण न होणे वगैरे यामुळे.
शतावरी चे फायदे हे होणारे गर्भपात टाळण्यासाठी सुद्धा होतात. ते कसे करते याची थोडक्यात माहिती बघू.
१. गर्भाशयाची हालचाल व्यवस्थित ठेवते
बहुतेक गर्भपात गर्भाशयाच्या चुकीच्या हालचाली ज्याला uterine tone म्हणतात त्यामुळे आणि अवेळी होणाऱ्या हालचाली मुळे होतात. यासाठी गर्भाशयातील स्नायू कमकुवत होणे आणि अकार्यक्षम होणे हे असते. शतावरी सेवन केल्यामुळे गर्भाशयांची हालचाल व्यवस्थित होते. सोबतच यासाठी महत्वाच्या असणाऱ्या गर्भाशयाचे स्नायू देखील मजबूत होतात. यामुळे शतावरीला गर्भशयाचे टॉनिक म्हटले जाते.
२. गर्भाशय मजबूत करते
गर्भाशयात असणारा गर्भ सुस्थितीत राहण्यासाठी गर्भाशय मजबूत आणि स्थिर असणे आवश्यक आहे. यासाठी शतावरी कल्पाचा उपयोग केला जातो. शतावरी गर्भशायाचे स्नायू बळकट करते तसेच गर्भाशयाला प्रसूती होईपर्यंत स्थिर ठेवते. ज्यामुळे प्रसूतिवेळी योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात गर्भशयाचे आकुंचन (Uterine Contractions) होते.
३. गर्भशयातील इन्फेक्शन कमी करते
शतावरी मध्ये Antibacterial आणि Anti-inflammatory गुणधर्म असल्यामुळे गर्भाशयातील सूज इन्फेक्शन कमी करण्यास मदत होते. गर्भाशयात इन्फेक्शन होऊन त्यामुळे गर्भपात होण्याचे प्रमाण देखील खूप आहे. तेव्हा गर्भधारणा झाल्यानंतर शतावरी कल्प सेवन करण्यास सुरुवात करावी ,पण फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच.
स्तनपानासाठी दूध बनवते
शतावरी चे फायदे बघत असताना स्तनपान चा विषय येऊ नये हे चुकीचे ठरेल.
कारण शतावरी चे फायदे अधिक प्रभावीपणे आणि अभ्यासात सिद्ध झाले आहेत ते फक्त स्तनपान करणाऱ्या महिलांच्या मध्ये दिसतात.
शतावरी वनस्पति ला Galactagogues असे म्हटले जाते. म्हणजे अशी वनस्पति ज्याने स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये दुधाची उत्पत्ति होते. हा शतावरी चा महत्वाचा आणि अत्यंत फायदेशीर असा उपयोग आहे.
प्राचीन दिवसांमध्ये मुख्यत्वे याच कारणांसाठी आपल्याला शतावरी चे फायदे बघायला मिळतात.
तसेच २०१० साली जर्नल ऑफ रिसर्च इन आयुर्वेद स्टडी मध्ये या संबंधी एक शोध निबंध प्रकाशित झाला होता. त्यामध्ये शतावरी हे दूध उत्पादन करण्यास कशी मदत करते याची पूर्ण माहिती दिली आहे.
शतवारीच्या या उपयोगासाठी सॅपोनिन्स (Saponins) आणि फायटोएस्ट्रोजेन्स (Phytoestrogens) हे त्यामध्ये आढळणारे दोन घटक कारण मानले जाते. या दोन रासायनिक द्रव्यांमुळे शतावरी स्तनदा महिलांमध्ये दूध उत्पन्न करते असा काही वैज्ञानिकांचा दावा आहे.
अशा पद्धतीने शतावरी कल्प गर्भधारणे पश्चात सुद्धा महिलांचे आरोग्य विषयक समस्यासाठी फायदेशीर ठरते.
नैसर्गिक शतावरी कल्प खरेदी करायची असल्यास येथे क्लिक करा.
३. मासिक पाळी नियमित करते
अनेक महिलांना मासिक पाळी संबंधित तक्रारी असतात जसे की नियमित न येणे, चुकणे, जास्त रक्तस्त्राव होणे, अंगावरून जाणे वगैरे. अशा आणि इतर मासिक पाळी संबंधित सर्व समस्यांसाठी शतावरी कल्प चा अत्यंत उपयोग होतो.
हे सुद्धा वाचा- मासिक पाळी चुकल्यास काय करावे?
विशेष करून मासिक पाळी नियमित करण्यासाठी शतावरी कल्पाचा अधिक उपयोग होतो. याचे कारण आपण अगोदर बघितले की शतावरी मुळे मासिक पाळी साठी लागणारे हॉर्मोन्स ची निर्मिती आणि बॅलेन्स होते.
शतावरी मध्ये जे फायटोएस्ट्रोजेन्स नावाचे घटक असते ते मासिक पाळीसाठी आवश्यक हॉरमोन बॅलेन्स ठेवण्यास मदत करते.
अजून एक यासंबंधी फायदा म्हणजे रजोनिवृत्तीच्या महिलांना होणारा त्रास शतावरी कमी करते.
हे सुद्धा वाचा- मासिक पाळी किती दिवस उशिरा येऊ शकते ?
२. शतावरी कल्पाचे इतर फायदे
वरच्या भागात आपण महिलांच्या प्रजनन आणि या संबंधित इतर आरोग्य समस्यांसाठी शतावरी चे फायदे बघितले.
शतावरी चे फायदे इतर बाबतीत देखील दिसून येतात जे स्त्री आणि पुरुष दोन्ही मध्ये सारखेच आहेत.
त्याच अनुषंगाने शतावरी चा इतर सामान्य आरोग्य समस्यांसाठी ज्या स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये आढळतात, त्यात शतावरी उपयोग कसा होतो याची माहिती बघू.
१. चिंता, नैराश्य कमी करते
चिंता किंवा नैराश्य यामुळे मानसिक आरोग्य पूर्णता बिघडू शकते.
आपल्याला जेव्हा चिंता होत असते किंवा आपण म्हणत असतो करमत नाही, मन लागत नही, अशा वेळेला शरीरात रासायनिक लेवल ला काही रासायनिक घटक रीलीज होत असतात.
अशा सर्व गोष्टी मध्ये हस्तक्षेप करून शतावरी चिंता आणि नैराश्य या गोष्टी कमी करते.
यामध्ये शतावरी कसे काम करते बघूया.
हे सुद्धा वाचा- अश्वगंधा चे फायदे
- शतावरी मध्ये अॅडप्टोजेनिक (Adaptogenic) गुणधर्म असतात. म्हणजेच यामधील घटक तुम्हाला आलेला तणाव आणि नैराश्य अशा परिस्थिति मध्ये जुळवून घेण्यास मदत करतात. यामुळे तुम्हाला नैराश्य, चिंता तर येईल पण ते असल्याची जाणीव नाही होणार.
- Cortisol नावाचे हॉरमोन आपल्या मनात किंवा शरीरात तणाव निर्माण करण्यास कारणीभूत असते. वाढते Cortisol चे प्रमाण तुमच्यामध्ये नैराश्य, चिंता, तणाव निर्माण करतात. शतावरी कल्प या Cortisol हॉरमोन ची पातळी नियंत्रित करून नैराश्य दूर करते.
- त्याचबरोबर शतावरी Serotonin आणि GABA सारख्या neurotransmitter चे सुद्धा नियमन करते. या दोन्ही Compounds मुळे आपला मूड बदलतो आणि तणाव कमी होतो.
- तसेच शतावरी मध्ये Anti-Inflammatory गुणधर्म असल्यामुळे शरीरातील झालेली झीज आणि यामुळे एकंदर येणारे नैराश्य कमी होते.
२. वजन नियंत्रित राहते
शतावरी तुमच्या शरीराचे वजन नियंत्रित ठेवते. इथे मी वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे याविषयी सांगत नाही. वजन नियंत्रण म्हणजे तुमचे वय, ऊंची आणि एकूणच शरीरयष्टी लक्षात घेता जेवढे तुमचे वजन हवे तेवढे वजन maintain ठेवणे.
याचा अर्थ असा की शतावरी चे फायदे हे वजन नियंत्रण करण्यासाठी सुद्धा आहेत.
याच संबंधी काही मुद्दे बघूया.
- वजन कमी करण्याच्या दृष्टीने शतावरी तुम्हाला जास्त वेळेसाठी पोट भरल्याची भावना देते, यामुळे तुम्ही नकळत जास्त जेवण करायचे टाळता.
- शतावरी मध्ये Anti-inflammatory गुण असल्यामुळे शरीरात आलेली सूज किंवा लठ्ठपणा कमी करते.
- तसेच शतावरी शरीराची metabolism प्रक्रिया वाढवते. यामुळे अधिक जलद गतीने जास्त प्रमाणात calories बर्न होऊन वजन कमी होण्यास मदत होते.
संबंधित – वजन कमी करण्यासाठी काय खावे | वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे
३. पुरूषांचे प्रजनन आरोग्य सुधारते
जसे महिलांचे प्रजनन आरोग्य समस्या शतावरी मुळे कमी होतात तसेच पुरुष संबंधित प्रजनन आरोग्य सुद्धा शतावरी मुळे चांगले राहते.
शतावरी कशा पद्धतीने पुरुष प्रजनन आरोग्य सुधारते ते बघूया.
- शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता शतावरी कल्प सेवन केल्यामुळे वाढते. यामध्ये शतावरी चे Antioxidant गुणधर्म उपयोगी येतात.
- काही तज्ञांच्या मते शतावरी मुळे पुरुषांमध्ये Testosterone हॉरमोन ची पातळी वाढते. ज्यामुळे एकूणच प्रजनन विषयी अनेक समस्या कमी होतात.
- याआधी आपण बघितले की शतावरी तणाव, नैराश्य दूर करते. हेच तणाव आणि नैराश्य पुरुषांच्या लैंगिक किंवा प्रजनन आरोग्यावर अनेक परिणाम करतात.
- प्रोस्टेट ची समस्या पुरुषांना सामान्यपणे वृद्धत्व काळात होते. पण शतावरीचे Anti-inflammatory गुणधर्म या प्रोस्टेट समस्या देखील दूर करते.
संबंधित- जास्त वेळ (सेक्स)करण्यासाठी काय करावे ?
शतावरी कल्प कसे घ्यावे ?
आता इथे प्रश्न पडतो की हे सर्व शतावरी चे फायदे मिळवण्यासाठी शतावरी कल्प कसे घ्यावे ?
तेच बघूया.
शतावरी वनस्पति चे अनेक स्वरूप उपलब्ध आहेत. पण आपण इथे शतावरी कल्प म्हणजेच शतावरी पाऊडर कसे घ्यावे याबद्दल एक थोडक्यात माहिती बघणार आहोत.
कसे घ्यावे ?
शतावरी कल्प तुम्ही कोमट पाणी सोबत, दुधा सोबत किंवा तुमच्या आवडत्या पेय बरोबर मिक्स करून घेऊ शकता.
कोणत्या वेळी घ्यावे ?
सामान्यपणे यासाठी तुमची जेवणाची रात्रीची किंवा सकाळची वेळ निवडावी. दोन्ही वेळच्या जेवणासोबत तुम्ही शतावरी कल्प घेऊ शकता किंवा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घ्यावे.
डोस
शतावरी चा डोस हा एक किंवा दोन चमचे प्रत्येकी एक वेळ या प्रमाणे निश्चित करावा.
शतावरी चे फायदे आणि त्या संबंधित इतर संशोधन अजून बरेच बाकी आहे. तरी आपण या लेखात उपलब्ध संशोधन संदर्भ घेऊन त्याच्या माहितीच्या आधारे शतावरी कल्पाचे शास्त्रीय दृष्ट्या उपयोग कोणते ते बघितले.
यासाठी शतावरी कल्पाचा उपयोग मनाने करणे चुकीचे ठरेल. तरी वरील कोणत्या ही समस्या साठी डॉक्टरांना विचारूनच उपचार घ्यायचे आहेत.
जर माहिती उपयोगी वाटली असेल तर कमेन्ट वर कळवा. धन्यवाद.
सुरक्षित, प्रभावी आणि नैसर्गिक शतावरी कल्प खरेदी करायची असल्यास येथे क्लिक करा.
FAQ’s
Nguồn: https://vuihoctienghan.edu.vn
Danh mục: फ़ायदा